मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > श्रीवर्धनच्‍या किना-यावर अनोळखी बार्ज
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
श्रीवर्धनच्‍या किना-यावर अनोळखी बार्ज Search similar articles
वेबदुनिया
मुंबई- कोकण किनारपटटीवरच्‍या श्रीवर्धनच्‍या समुद्रात एक अनोळखी बार्ज जहाज आढळून आले असून ते गेल्‍या पाच दिवसांपासून एकाच ठिकाणी आहे. हे जहाज कुणाचे आणि कुठल्‍या देशाचे हे गेल्‍या दोन दिवसांनंतरही अदयाप स्‍पष्‍ट झालेले नाही. तर सरकारी सुत्रांनीही त्‍याबददल काही सांगण्‍यास नकार दिल्‍याने स्‍थानिक रहिवाशांमध्‍ये भितीचे वातावरण आहे.

'डायना बार्ज' नाव असलेले हे जहाज गेल्‍या चार ते पाच दिवसांपासून श्रीवर्धन येथील समुद्रकिना-यावर अडकले आहे. हे जहाज नक्की कुठून आले हे अदयाप स्‍पष्‍ट झालेले नाही. तटरक्षक दलाच्‍या सुत्रांनी या जहाजावर जावून माहिती घेण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र खराब हवामानामुळे बार्जपर्यंत जाणे अदयापही शक्‍य झालेले नाही.
आणखी
चेतन दातार यांचं निधन
मुंबईला गणेशोत्‍सवाचे वेध
अहलूवालियांना लोकमान्य टिळक पुरस्कार
राज्‍यात सुरक्षेचे कडक उपाय-मुख्‍यमंत्री
सामन्याविरोधात राणेंचा 'प्रहार'
मुंबईत तीन काश्मिरी युवकांना अटक