मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > शिवसेनाप्रमुखांना धमकी देणाऱ्या शेट्टीला अटक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शिवसेनाप्रमुखांना धमकी देणाऱ्या शेट्टीला अटक Search similar articles
वेबदुनिया
एका संकेतस्थळाच्या माध्यमातून शिवसेना विरोधी कम्युनिटी काढून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या जोहराज उर्फ सुरज शेट्टी या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. मीरा रोड येथून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शनिवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना एका संकेस्थळावर हा प्रकार आढळून आला. त्यांनी त्वरित याची माहिती आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिली. यानंतर वाऱ्यासारखी ही बातमी पसरल्यावर सेनाभवनाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने त्वरित ठाण्याचे पोलिस आयुक्त प्रशांत बुरडे यांची भेट घेत त्यांना त्या संकेतस्थळाचे पुरावे सादर केले.

पोलिसांनी या माहितीच्या आधारे सायबर क्राईम विभागाची मदत घेत मीरा रोड येथून सुरज शेट्टी नामक व्यक्तीला अटक केली आहे.
आणखी
अहमदनगर उडविण्‍याची धमकी
श्रीवर्धनच्‍या किना-यावर अनोळखी बार्ज
चेतन दातार यांचं निधन
मुंबईला गणेशोत्‍सवाचे वेध
अहलूवालियांना लोकमान्य टिळक पुरस्कार
राज्‍यात सुरक्षेचे कडक उपाय-मुख्‍यमंत्री