नागपूर- लोकसभेत विश्वासमत ठरावावरील चर्चेच्या वेळी राहुल गांधी यांच्या भाषणाचा मुख्य मुददा ठरलेल्या कलावती आणि शशिकलाच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असले तरीही यवतमाळ जिल्हयातील अनेक गावांमधील शेतक-यांनी कर्जफेड करण्यासाठी आपली कीडनी विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून कलावती बंदुरकरची कथा ऐकविल्याने अनेकांना तिच्याबददल सहानुभूती वाटली. त्यात अनेक संस्था तिच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या. मात्र विदभात आकाशच फाटल्याची स्थिती असून ठिगळ तरी कुठे-कुठे लावणार अशी स्थिती आहे.
या गावात आता माध्यमांच्या प्रतिनिधींचीही गर्दी होउ लागली असून आता येथील कर्जाने त्रस्त शेतक-यांना आपल्याही पदरी काही पडेल अशी वेडी आशा लागून आहे. यंदा पाउस नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कर्ज फेड करण्यासाठी आपली किडनी विकण्याची तयारी दर्शविली आहे.
|