हुबळी बॉम्बस्फोट खटल्यातील संशयितास येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर कर्नाटक पोलिसांना सोपवण्यात आले आहे.
झक्ती शौकत अली इक्बाल अहमद यास मस्कतहून परतल्यानंतर विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हुबळी येथील न्यायालयाने त्याच्या अटकेसाठी नोटीस काढली होती.
हुबळी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाच्या आवारात दहा मे रोजी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट करण्यात आला होता.
|