मुंबई- अंडरवर्ल्डचं विश्व पूर्णपणे फोनवर अवलंबून आहे. दाउद, छोटा राजन आणि इतर अनेक अंडरवर्ल्ड डॉन आज देशाबाहेर आहेत. मात्र तरीही ते परदेशातून आपले मुंबईतील नेटवर्क फोनव्दारे हॅण्डल करतात. अंडरवर्ल्ड जगतात. या 'भाई' लोकांच्या कॉलला इतके महत्व असते त्यांच्या एका फोनवी मोठमोठया उलाढाली होतात.
या 'भाई' लोकांचे फोन कुठून कुठे जातात. याकडे पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा व अनपेक्षित कॉल टाळण्यासाठी आता दाउद गॅंगच्या मेंबरांनी अभिनव शक्कल लढविली आहे. या भाई लोकांच्या मोबाईलची कॉलर टयुन 'आप जिस उपभोक्ता को कॉल कर रहे है, वो इस वक्त कव्हरेज क्षेत्र के बाहर है' अशी लावण्यात आली आहे. त्यामुळे कॉल करणारा व्यक्ती फोन बंद करते. मात्र सलग 3 वेळा कॉल आला तर कॉल करणारा आपल्या संपर्कातील आहे असे स्पष्ट होत असल्याने ते फोन घेत असतात.
मुंबई अंडरवर्ल्डचे काम पूर्णतः फोनवर चालत असल्यामुळे पोलिसांनी आता 'भाई' लोकांच्या फोनवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे अंडरवर्ल्ड जगतही त्यावर मात करण्यासाठी 'हायटेक' शक्कल लढवित आहे.
|