मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > नारायण राणेंचा अखेर राजीनामा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नारायण राणेंचा अखेर राजीनामा
वेबदुनिया
महसूलमंत्री नारायण राणे यांनी अखेर आज व्हिडीओकॉनला दिलेल्या जमिनीच्या मुद्यावरून पक्षश्रेष्ठींकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात चालविलेल्या मोहिमेला आता राजीनाम्याच्या कृतीची जोड दिल्याने आता राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

व्हिडीओकॉन कंपनीला नवी मुंबईतील सिडकोची चार हजार कोटी रूपयांची जमीन तीनशे कोटीत द्यायचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याला त्याच बैठकीत राणेंनी तीव्र विरोध केला होता. शिवाय लेखी विरोधही नोंदवला होता. या मुद्यांवरून थेट मुख्यमंत्र्यांशीच त्यांची बोलाचाली झाली होती. संतापलेल्या राणेंनी त्याचवेळी राजीनाम्याचा इशारा दिला होता. यानंतर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे काल हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कट्टर विरोधक प्रभा राव यांची भेट घेऊन राणेंनी गुप्त चर्चाही केली होती. मुख्यमंत्री व राणेंतील तापलेल्या संबंधांची दखल हायकमांडनेही घेतली होती. पण राणे यांचा संताप काही कमी झाला नाही आणि अखेर त्यांनी राजीनामा देऊन आपला निषेध जाहीर व्यक्त केला.

आता यापुढे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आणखी
राणेंचा सरकारवर पुन्‍हा प्रहार
विदर्भात आभाळ कोसळले, 14 जणांचा बळी
मुलुंडमध्‍ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्‍यू
पुण्याजवळ कार-टँकर धडकेत सात ठार
गोव्याचे अर्थमंत्री दयानंद नार्वेकरांचा राजीनामा
कॅबिनेटच्‍या बैठकीत राणे-देशमुखांत खडाजंगी