मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > आता महाराष्ट्राबाहेरही जाणार 'गोविंदा'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आता महाराष्ट्राबाहेरही जाणार 'गोविंदा'
नरेंद्र राठोड
वेबदुनिया
मुंबईतील गोविंदांना फक्त महाराष्ट्रातूनच नाही, तर राज्याबाहेरूनही जोरदार मागणी आहे. मुंबईतील उंच इमारतींशी स्पर्धा करणारी दही हंडी आणि त्याला फोडण्यासाठी आपले जीव धोक्यात घालणाऱ्या गोविंदांचे उभ्या महाराष्ट्राला आकर्षण आहे.

आता याच जिगरबाज गोविंदांना मुंबईच काय महाराष्ट्राबाहेरूनही मागणी आहे. त्यांना राज्याबाहेरूनही आता दही हंडीची आमंत्रणे येऊ लागली आहेत.

मुंबईतील अनेक गोविंदा मंडळांना अशी आमंत्रणे देणारी अनेक पत्रे मिळत असून, यात त्यांना बक्षिसापोटी देण्यात येणारी रक्कमही लाखोच्या घरात आहे.

मुंबईतील पुरुष दहीहंडी पथकांनाच अशी आमंत्रणे मिळत आहेत असे नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या गोरखनाथ दहीहंडी महिला पथकालाही कर्नाटकातील प्रसिद्ध उडपी मंदिराकडून आमंत्रण आले असून, मंडळाने ते आमंत्रण स्वीकारले आहे. कर्नाटका पाठोपाठ गुजरातमधूनही मंडळांना आमंत्रणे मिळत आहेत.

यात गुजरात मधील द्वाकाधीश रणछोडदास मंदिर ट्रस्टने महाराष्ट्रातील गोविंदांसाठी सर्वाधिक रकमेची बोली लावली आहे. इतकेच काय तर ठाण्यातील जय गोविंद पथकाला तर चक्क परदेशातून आमंत्रण आले आहे. आणि या पथकाने तर परदेशी जाऊन दही हंडी फोडण्याचे खास प्रशिक्षणही घेतले आहे.
आणखी
रतन टाटांना आयआयटीकडून मानद डॉक्टरेट
नारायण राणेंचा अखेर राजीनामा
राणेंचा सरकारवर पुन्‍हा प्रहार
विदर्भात आभाळ कोसळले, 14 जणांचा बळी
मुलुंडमध्‍ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्‍यू
पुण्याजवळ कार-टँकर धडकेत सात ठार