मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > वैशिष्ट्यपूर्ण कौमी एकता सप्ताह
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वैशिष्ट्यपूर्ण कौमी एकता सप्ताह
राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्यभाव जोपासनेसाठी राष्ट्रीय पातळीवर नेहमीच विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. येत्या १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण असा कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

एकात्मतेच्या प्रतिज्ञेबरोबरच अल्पसंख्याक कल्याण, भाषिक सुसंवाद, दुर्बल घटक दिन, सांस्कृतिक एकता दिन, महिला दिन एवढेच नव्हे तर पर्यावरण संवर्धन दिन असे विविध दिन या सप्ताहात साजरे केले जातात आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते. हे या कौमी एकता सप्ताहाचे सर्वात महत्त्वपूर्ण वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे.

या सप्ताहात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ, मिरवणूक, सभा, चर्चा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट प्रदर्शने आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत. लोकसहभागासाठी प्रत्येक दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांसह सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम होतील.

१९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली जाणार आहे. हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळला जाईल. धर्मनिरपेक्षता, जातीयवादी विरोध व अहिंसा यांविषयी जागृती करणार्‍या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन या दिवशी केले जाईल.

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमांवर भर देण्याकरिता २० नोव्हेंबर हा दिवस अल्पसंख्याक कल्याण दिवस म्हणून पाळला जाणार आहे. बंधूभाव वृद्धिंगत करण्यासाठी या दिवशी विशेष मिरवणुका काढण्यात येतील.

भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारसाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने २१ नोव्हेंबर हा दिवस `भाषिक सुसंवाद दिवस` म्हणून साजरा केला जाईल. विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलनाचे आयोजन या दिवशी केले जाईल.

२२ नोव्हेंबर हा दिवस दुर्बल घटक दिवस असेल. वीसकलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती-जमाती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने या दिवशी सभा व मेळावे भरविण्यात येतील. यात इंदिरा आवास योजना व घरासाठी जागांचे वाटप व कर्जाचे वाटप, अतिरिक्त जमिनीचे भूमिहीन मजुरांना वाटप, गरीबांना कायदेविषयक सहाय्य देण्याच्या कार्यक्रमावर भर दिला जाईल.

भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देण्यासाठी २३ नोव्हेंबर हा सांस्कृतिक एकता दिवस म्हणून पाळला जाईल. सांस्कृतिक संरक्षण व एकात्मतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातील.

२४ नोव्हेंबर रोजी महिला दिन पाळला जाईल. भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका विशद करणार्‍या कार्यक्रमांवर या दिवशी भर दिला जाईल.

पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देण्याकरीता २५ नोव्हेंबर हा दिवस जोपासना दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. मेळाव्यांद्वारे पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येईल.
संबंधित माहिती शोधा
आणखी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर कडक बंदोबस्त
तळबीडच्या विकासासाठी ३५ लाख देणार
पुरोहितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
रॉय प्रकरणी उद्या सुनावणी
राज यांच्‍या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली
राज यांना झेड सुरक्षा देण्‍याची मागणी