राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनामुळे अनेक संघटना आणि पक्षांचा रोष सहन करावा लागत असला तरीही त्यांना मुंबईतील मुस्लिम समुदायाने पाठिंबा दिला आहे.
उमरखाडी आणि डोंगरी या मुस्लिमबहुल भागात मनसेला जोरदार समर्थन मिळत असून त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला निवडणुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मुस्लिम बहुल भागांमध्ये गेल्या वर्षापासून महापालिकेच्या निवडणुकीत अत्यल्प मतदान झाले होते. हे हेरून मनसेने या भागात आता आपला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली असून गेल्या तीन-चार महिन्यातच 2000 हूनही अधिक लोकांना पक्षाचा सदस्य बनविण्यात मनसेला यश मिळाले आहे. |