मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अद्दल घडविण्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले तरी जाईल. मात्र राजला वठणीवर आणेलच. हे वाक्य आहे, जमशेदपूर न्यायालयात राज ठाकरे यांच्यावर खटला दाखल करणा-या हामिद रजा या वकीलाचे.
राज ठाकरेंनी छटपूजा आणि बिहारी व्यक्ती विरोधात अपमानास्पद वक्तव्ये देऊन उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार या वकीलाने दाखल केली आहे. या खटल्याच्या सुनावणीवरून सध्या बराच वाद रंगला असून जमशेदपूर न्यायालयाने राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
हामिद रजा यांनी दोन फेब्रुवारी रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी ए. के. तिवारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यावरून राज यांच्या विरोधात 30 सप्टेंबर रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. तर राज यांनी या खटल्यासंदर्भात माझगाव न्यायालयातून जामीन मिळविला आहे. |