महाराष्ट्र एटीएस दबावाखाली काम करत असून, एटीएसला बदलण्यात यावे ही भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची मागणी फेटाळून लावत, एटीएस निष्पक्ष स्वरूपात मालेगाव स्फोटांची चौकशी करत असल्याची क्लिनचीट मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
राजधानीतील महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकारपरिषदेत आज देशमुख यांनी भाजपची मागणी फेटाळून लावत एटीएसच्या कोणत्याही कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
यापूर्वीही एटीएसने अनेक प्रकरणाची चौकशी केली असून, त्या प्रकरणांची चौकशी करताना अडवाणींनी कोणताही आक्षेप का घेतला नाही असा प्रश्नही देशमुख यांनी या प्रसंगी केला. |