नाशिकमधून पोलिसांनी अठरा लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गंगापूर रस्त्यावरील एका मोबाईल दुकानातून या नोटा हस्तगत करण्यात आल्या.
मोबाईल वर्ल्ड या गेल्या आठवड्यातच सुरू झालेल्या दुकानात बनावट नोटा आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्री उशीरा पोलिसांनी छापा घालून पाचशे व हजाराच्या दहा लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. दुकानासमोर पार्क केलेल्या कारमधूनही बनावट नोटा मिळाल्या. एकूण अठरा लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दुकानाचे मालक संजय वर्मा यांच्या मालकीची ही गाडी असल्याचे समजते. पोलिसांनी वर्मा, प्रमोद ठाकरे, दुकानात काम करणारे सुधाकर पांडे व गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. |