मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयितांना 'मोक्का' लावल्याने आता हा खटला नाशिकहून मुंबईतल्या शिवडी येथील मोका न्यायालयात स्थलांतरीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील दहा आरोपींना मोका लावल्यानंतर मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने हा खटला मुंबईत हलविण्याची याचिका केली होती. बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र याला विरोध केला होता. एटिएस आपल्या सोयीसाठी हा खटला मुंबईत हलवत आहे, असा बचाव पक्षाचा आक्षेप होता. या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वकिल उमेश वालझाडे यांनी सांगितले. |