सुमारे साडे तीन वर्षांनंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे मात्र अनुपस्थित होते.
दरम्यान, ही केवळ कौटुंबीक भेट असून याचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केला आहे. तब्बल 45 मिनिटे चाललेल्या या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र समजू शकले नसले तरीही राज यांनी बाळासाहेबांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीच्या चौकशीसाठी ही भेट दिल्याचे कळते. |