मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > कॉंग्रेसचा आता कांदापोह्यांचा स्‍टॉल
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कॉंग्रेसचा आता कांदापोह्यांचा स्‍टॉल
नेत्‍यानंतर आता खाद्यपदार्थांचेही वाटप
वेबदुनिया
एरवी म.गांधी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्‍ट्रीय नेत्‍यांनाही सोयीनुसार आपल्‍या पुरते वाटून घेणा-या पक्षांनी आता वडापाव, कांदेपोहे, उपमा यासारख्‍या खाद्यपदार्थांनाही वाटून घेण्‍यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने वडापावच्‍या ग्‍लोबलायझेशनसाठी 'शिव वडापाव' सुरू केला आणि त्‍याला मराठी माणसाचा विशेषतः मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्‍याचे दिसताच आता कॉंग्रेसनेही खाद्यपदार्थांच्‍या या स्‍पर्धेत उडी घेतली आहे.

शिवसेनेच्‍या वडापाव संमेलनानंतर आता काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रीयन कांदे पोहे संमेलन भरविण्‍याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी ही घोषणा केली असून लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरील आझाद मैदानावर हे संमेलन भरविले जाणार आहे. या संदर्भात त्‍यांनी कृपाशंकर सिंह यांच्याशी चर्चा केल्‍यानंतर या योजनेचा आराखडा मुखमंत्र्यांकडे सादर करणार असल्‍याचे सांगितले आहे.

शिवसेनेच्‍या वडापावला शह देण्‍यासाठी हे महाराष्ट्रीयन कांदेपोहे सुरू केले जात असल्‍याचे स्‍पष्‍ट असल्‍याने आगामी काळात यावरून चांगलेच राजकारण रंगण्‍याची चिन्‍हे दिसत आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
साहित्य संमेलन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
साध्वी प्रकरणी मानवाधिकार आयोगाची नोटीस
पुण्यात कुटुंबाची आत्महत्या
जळगाव जिल्‍हा बँकेवर शेतकरी पॅनलचे वर्चस्‍व
मनसे लोकसभा निवडणूक लढविणारः राज ठाकरे
मंत्रीमंडळाचा दोन दिवसात विस्‍तारः मुख्‍यमंत्री