मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > स्‍व.धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
स्‍व.धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
वेबदुनिया
साधी राहणी व माणसे जुळवण्याची जबरदस्त ताकद असणार्‍या नानासाहेबांनी सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य केले आहे. राज्य कसे करावे हे शिवरायांनी ज्या रायगडातून शिकविले तेथूनच जीवन कसे जगावे याचे उत्तम उदाहरण घडवून देणारा समाज नानासाहेबांनी घडविला, असे मत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंगळवारी नवी मुंबई येथे व्‍यक्‍त केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2008 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रायगड जिल्ह्यातील ज्‍येष्ठ निरुपणकार स्व.नानासाहेब धर्माधिकारी यांना 1 मे 2008 रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र 8 जुलै 2008 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने हा पुरस्कार त्‍यांचे पुत्र आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आज संविधान दिन
एटीएसचा तपास कायदेशीरच: देशमुख
कॉंग्रेसचा आता कांदापोह्यांचा स्‍टॉल
साहित्य संमेलन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
साध्वी प्रकरणी मानवाधिकार आयोगाची नोटीस
पुण्यात कुटुंबाची आत्महत्या