एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना ठार करण्याची धमकी दिली गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला असल्याची माहितीही समोर आली आहे.
मालेगाव स्फोटाच्या आरोपाखाली हिंदू संघटनांच्या लोकांना अटक केल्यानंतर साध्वी प्रज्ञासह सात जणांनी एटीएसवर छळ केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. |