मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > आर.आर.पाटील यांची गच्‍छंती, तर विलासरावही जाणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आर.आर.पाटील यांची गच्‍छंती, तर विलासरावही जाणार
वेबदुनिया
RR patil
MH GOVT
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर एका मागोमाग एक राजीनामे सुरू झाले असून राज्‍याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अंतरात्‍म्याचा हवाला देत राजीनामा दिला आहे. तर मुख्‍मंत्र्यांनीही आपला राजीनामा कॉंग्रेस हायकमांडकडे पाठविला असून तो राष्‍ट्रपतींच्‍या दौ-यानंतर उद्या मंजूर होण्‍याची दाट शक्‍यता आहे.

मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्‍यावर राजीनाम्‍यासाठी दबाव आला होता. तर मुख्‍यमंत्र्यांनी ताजच्‍या पाहणीसाठी चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा व आपला अभिनेता मुलगा रितेश देशमुख यांना काल सोबत नेल्‍याने ते देखिल अडचणीत आले असून त्‍यांनीही पक्ष प्रमुखांकडे राजीनामा दिला आहे. आणि त्‍यास मंजुरी मिळण्‍याचीही दाट शक्‍यता आहे.

दरम्‍यान राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍या उपस्थितीत पक्षाच्‍या प्रमुख नेत्‍यांच्‍या झालेल्‍या बैठकीत राजीनाम्‍याचा निर्णय झाला असण्‍याची शक्‍यता आहे. गृहमंत्री पदावर आता पाटबंधारे मंत्री अजित पवार, छ्रगन भूजबळ किंवा राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्‍यक्ष आ.अरुणभाई गुजराथी यांच्‍या निवडीची शक्‍यता निर्माण झाली आहे.

vilasrao
MH GOVT
दरम्‍यान, आधीच नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या विलासरावांनी आपला राजीनामा कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींकडे यांच्‍याकडे पाठविल्‍याची माहिती त्‍यांनी स्‍वतः घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आता निर्णय पक्षाध्‍यक्षांनी घ्‍यावा असेही त्‍यांनी जाहीर केले आहे. भाजपशासित राज्यात दहशतवादी घटना घडल्यानंतरही तेथे त्यांनी राजीनामे दिले नव्हते. मात्र, आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे सांगून हे एक मोठे उदाहरण घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांची कॉंग्रेस विरुध्‍द नवी खेळी
संबंधित माहिती शोधा
आणखी
विलासरावांचा आज राजीनामा?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी चव्हाण?
विलासरावांना काळजी पोराच्या चित्रपटाची
रितेश, रामूमुळे विलासराव गोत्यात
सोलापुरजवळ अपघातात दहा ठार
साध्वींच्या समर्थनात सेनेचा महाराष्ट्र बंद