राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर.आर.पाटील यांचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठविला आहे. नवीन गृहमंत्र्याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय घेऊन जाहीर केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख आणि कृषिमंत्री पवार यांनी सांगितले, की दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पाटील यांना आपल्या कार्यपध्दतीवर दुःख झाले होते आणि त्यांनी तीन दिवसांपूर्वीच राजीनामा देण्यासंदर्भात आपल्याशी चर्चा केली होती. |