मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > मि.हसमुखलाल सुशीलकुमार यांना संधी मिळणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मि.हसमुखलाल सुशीलकुमार यांना संधी मिळणार
इच्छुकांनी बाशिंग बांधले
मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदाची जबाबदारी कोणावर सोपविली जाणार? आणि सध्याच्या परीस्थितीत या काट्याच्या खुर्चीवर बसण्यास कोण राजी होणार, या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत वजन असणारे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा असून गृहमंत्री पदासाठी सध्या तरी अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

नवा मुख्यंमत्री कोण?
विलासराव देशमुख यांना यांच्यावर मुख्यंमत्री पदाचा राजीनामा देण्‍याची गच्छंती लोढावल्यानंतर त्यांनी निमुटपणे पक्षश्रेंष्ठींकडे आपला राजीनामा पाठविला. या पदाचा वारसदार ठरवण्यासाठी कॉग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक देखील झाली. सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ व अनुभवी असल्याने अशा परिस्थितीत त्यांच्याकडे सुत्रे देणे इष्ठ ठरणार असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, विलासरावांचे दिर्घकालीन विरोधक नारायण राणे तसेच पतंगराव कदम यांचीही नावे चर्चेत आहेत. शिंदे आणि चव्हाण यांच्यावर सध्या केंद्रीय जबाबदा-या आहेत आणि अगामी निवडणूकीत त्यांच्यावर खरी मदार रहाणार आहे. यावेळी त्यांना पुसेसा अवधी मिळावा यासाठी त्यांच्यावर जबाबदा-यांचे आझे न वाढवता राणे आणि कदम यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधलेल्या या दोघा नेत्यांना सहा महिन्यांचा मुख्यमंत्री करून पक्षातील त्यांचा कोटा भरून काढण्याची खेळी श्रीमती सोनीया गांधी खेळू शकतात. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पण, मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.


आबांचा वारसदारही ठरणार

आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदाची जबाबदारी कोणावर सोपविली जाणार? आणि सध्याच्या परीस्थितीत या काट्याच्या खुर्चीवर बसण्यास कोण राजी होणार, या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या तरी अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर 'मोठ्या शहरात असे हल्ले होतच राहतात' ये वतव्य आर. आर. यांना चांगलेच भोवले. त्यांनी राजीनामा देण्याच्या मागणीने जोर धरल्याने मुख्यमंत्र्यांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा देऊन टाकला. आर.आर. यांनी राजीनामा दिला असला तरी अद्यापी तो मंजूर झालेला नाही. गृहमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द नेहमीच गोत्यात आली आहे आणि सध्यातरी त्यांना अभय मिळण्याची शक्यता नसल्याने राष्ट्रवादीला लवकरच पर्याय द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेसकडे अनेक मोहरे आहेत पण, राष्ट्रवादीकडे गृहमंत्री पदासाठी तुलनेने लायक उमेदवार नाहीत आणि जे आहेत त्यांच्याकडे महत्वाची पदे आहेत. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांच्या अवधीसाठी या काट्याच्या खुर्चीवर कोणाला बसविले जातेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आर. आर यांचा राजीनामा मंजूर केला गेला नाही तर प्रश्नच येणार नाही. मात्र, तसे न झाल्यास गृहमंत्रीपदाचा चांगलाच 'अनुभव' असणारे छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा हे पद दिले जाण्याची शक्यता आहे. तेलगी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ओरोप झाल्यानंतर भुजबळ यांच्याकडून हे पद नामुष्कीजनक पद्धतीने काढून घेण्यात आले होते. आता त्यांना पुन्हा संधी मिळाल्यास पूर्वीची प्रतिष्ठा मिळविण्यासाठी ते ही जबाबदारी निश्चितच स्वीकारतील. दुसरीकडे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना संधी मिळते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पुतण्याचे मन राखण्याची संधी पवारांकडे आहे. पण, आत्तापर्यंत त्यांनी कधीच भावनिक दृष्ट्या निर्णय घेतलेले नाहीत. प्रसंगी आपल्या पुतण्याची नाराजी स्वीकारून त्यांनी आर.आर. यांना मोठे केले होते.

हा निर्णय घेताना निवडणूका तोंडावर आहेत हे विसरून चालणार नाही. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला आपली गेलेली पत भरून काढावी लागणार आहे. त्यामुळे किमान टीका न होणारा उमेदवार त्यांना द्यावा लागेल. ज्याप्रमाणे दिल्लीत शिवराज पाटलांचे गृहीमंत्री पद काढून घेतल्यावर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली तोच पॅटर्न पवार याठिकाणी वापरण्याची शक्यता आहे. अर्थात अर्थमंत्री जयंत पाटील यांची चांगली प्रतिमा आहे. वेळ मारून नेण्यासाठी त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा तात्पुरता भार सोपविण्याची खेळी पवार खेळतील, अशीही शक्यता आहे. आव्हाने स्विकारण्यात तरबेज असणा-या जयंत पाटलांना यानिमित्ताने आपले राजकीय वजन वाढवून घेण्याबरोबर पवारांच्या मर्जीत जाऊन आबांचा काटा काढण्याची संधी चालून येणार आहे. आता पवार कोणती खेळी खेळतात ते पाहूयात.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुख्‍यमंत्र्यांचा राजीनामा हायकमांडकडे
पतंगराव मुख्यमंत्र्यांच्या भेटीस
आबांनी तीन दिवसांपूर्वीच दिला राजीनामा
लोकांच्या संतापामुळेच आबांची नांगी - मुंडे
आर.आर.पाटील यांची गच्‍छंती, तर विलासरावही जाणार
विलासरावांचा आज राजीनामा?