मुंबईला 60 तास बंदुकीच्या टोकावर खिळवून ठेवलेले आणि मानवतेचे शत्रू असलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या पवित्र भूमीत दफन करू देणार नाही, असा पवित्रा भारतातील मुस्लिम संघटनांनी घेतला आहे. शेकडो लोकांच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या या गिधाडांना भारताबाहेर समुद्रात नेऊन फेका असे आवाहनही या संघटनांनी केले आहे.
मायानगरी मुंबईत रंक्तरंजित होळी खेळून 200 निरपराधांना ठार करणा-या या दहशतवाद्यांना त्यांच्या प्रमुखांनी मेल्यानंतर 'जन्नत' मिळेल असे आमीष दाखविले असेल तरीही त्यांना जन्नत तर दूर दफन करण्यासाठी जमीन आणि कफनही न देण्याचा निर्णय मुस्लिम समुदायाने घेतला आहे. मुस्लिम धर्मात आपल्या देशावर आणि मानवतेवर प्रेम करा असे शिकविले आहे. आणि हे मानवतेचे आणि आपल्या देशाचे शत्रु आहेत. त्यामुळे त्यांना या पवित्र भूमीत दफन होण्याचा कोणताही अधिकार नाही. भारत सरकारला जर त्यांच्याशी सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी त्यांना पाकच्या भूमीत नेऊन फेकावे नाहीतर समुद्रात मात्र आम्ही त्यांना कोणत्याही दफन भूमीत दफन करू देणार नाही, असेही संघटनांनी जाहीर केले आहे.
|