मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील 40 जागांना उडवून देण्याचा फॅक्स पोलिसांना मिळाल्याने शहरातील प्रमुख जागांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस नियंत्रण कक्षाला हा फॅक्स मिळाला असून, बँका, रेल्वे स्टेशन, शैक्षणिक संस्थांसह शहरातील महत्त्वाच्या 40 जागांना उडवण्याची धमकी यातदिली आहे.
पुण्यातील गणेश पेठेतून हा फॅक्स करण्यात आला असून, फॅक्सचे दुकान चालवणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
यानंतर शहरातील महत्त्वाच्या जागी बॉंम्बशोधक पथक आणि शोध पथक तैनात करण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. |