मुंबईवरील हल्ल्यानंतर आठवडा नाही उलटला तोच आता 'राज'कारण चांगलंच पेटलंय. या हल्ल्यात ठार झालेल्या मराठी पोलिसांची कड घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एसएमएस अभियान चालवले आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी या हल्ल्यानंतर आता कुठे गेले राज ठाकरे? अशी टीका केली होती. तिला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी हे एसएमएस पाठविले आहेत. या एसएमएसमध्ये म्हटले आहे, की मुंबई वाचविण्यात ज्या लोकांचे प्राण गेले ते सर्व मराठी होते. 'मनसे' कार्यकर्ते रक्तदान, मदतकार्य व मृतदेह उचलण्यात व्यस्त होते. दरम्यान, हा एसएमएस अमिताभ बच्चन यांनाही पाठविण्यात आला. त्यामुळे ते संतप्त झाले आहेत. आपल्या ब्लॉगवरही त्यांनी यावर टीका केली आहे. दरम्यान, मुंबईवरील हल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधात हिंदी भाषक पट्ट्यात एसएमएस अभियान सुरू झाले होते. त्यात मुंबईचे रक्षण एनएसजीच्या २०० परप्रांतीय कमांडोंनी केले आणि त्यामुळेच राज ठाकरे सुखाची झोप घेऊ शकले असे म्हटले होते. त्याला उत्तर देण्यासाठीच मनसेने हे एसएमएस पाठविल्याचा अंदाज आहे. आता कुठे गेले राज ठाकरे? |