मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > नव्या नेतृत्वाची आज घोषणा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नव्या नेतृत्वाची आज घोषणा
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामे मंजूर झाल्याने आता देशमुख-पाटील 'राजवट' संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले असून या पदासाठी नवीन नेत्यांची निवड आज गुरूवारी होत आहे. मात्र, नेता निश्चित करण्यामध्ये पक्षामध्येही संभ्रम होता. मुख्यमंत्रीपदाची माळ सुशिलकुमार शिंदे यांच्या गळ्यात पडेल अशी चर्चा असली तरी आक्रमक नेता म्हणून नारायण राणे यांना संधी मिळण्याचे संकेत दिल्लीतून मिळत आहेत.

कॉग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री देशमुख यांचा राजीनामा मंजुर केल्यानंतर पक्षनिरीक्षक आज गुरूवारी मुंबईत येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणा-या या राजीनामा नाट्यावर पडदा पडला असला तरी नवे मुख्यमंत्री कोण? याबाबत संभ्रम कायम होता. कॉग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनीया गांधी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांचे नाव जवळजवळ निश्चित केले होते मात्र, त्यांना यापूर्वीही संधी मिळाली आहे आणि सध्याच्या अस्थिर परिस्थितीत आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याने नारायण राणे यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कॉग्रेसने नवा मुख्यमंत्रीपद घोषीत केल्यानंतरच आपण उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा नवीन नेता जाहीर करणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉग्रसेने आज नवा मुख्यमंत्री जाहीर केल्यावर राष्ट्रवादीलाही लगेचच निर्णय घ्यावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी छगन भुजबळ तर गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील, अजीत पवार यांची नावे चर्चेत आहेत. पण, या मावळत्या आणि सध्या टिका होणा-या या पदांसाठी ही मंडळी सहजासहजी राजी होतील का? हा प्रश्न आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
भुजबळ बनणार उपमुख्यमंत्री?
विलासराव बॅक टू 'आशियाना'
सरकार गो बॅक.....
सीएसटीत सापडले दोन आरडीएक्स बॉम्ब
हल्यानंतरही पोलिस वेबसाईट झोपलेलीच
मुंबईत रॅली व लाऊडस्‍पीकरवर बंदी