मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अखेर राज्याचे उद्योग आणि सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांनी बाजी मारली असून, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्याची औपचारिकता आता बाकी असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल तीन दिवस चाललेल्या मुख्यमंत्री नाट्यावर आज पडदा पडला असल्याची चर्चा असून महसूल मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पछाडत आज चव्हाणांनी बाजी मारली असल्याचे वृत्त आहे. अजून पर्यंत या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. |