मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > चव्हाणांच्या मार्गात राणे आडवे
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चव्हाणांच्या मार्गात राणे आडवे
वेबदुनिया
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं गुऱ्हाळ काल थांबलं असलं तरी आता महसूल मंत्री नारायण राणे हे चव्हाणांच्या मार्गात आडवे येऊन उभे झाल्याने आज पुन्हा दिवसभर मुख्यमंत्री पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ चालूच राहण्याची शक्यता आहे.

पक्ष निरीक्षकांनी दिवसभर आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर आपला अहवाल आज 10 जनपथवर पाठवला असून आज महाराष्ट्राचा 'भाग्यविधाता' आज निवडला जाणार असल्याची जनतेला अपेक्षा आहे.

या शर्यतीत राणे आणि चव्हाण आघाडीवर होते, परंतु चव्हाण यांच्या बाजूने विलासराव समर्थक आणि इतर आमदारांनी अनुकूलता दाखवल्याने राणेंचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. आता राणे पदासाठी अडून बसल्याचे बोलले जात असून, त्यांची समजूत काढल्यानंतरच यावर निर्णय ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वीच आतल्या गोटातून आलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर उद्योग आणि सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरू केले असून, त्यांची या पदावर निवड झाल्याचे निश्चित मानले जात आहे.

अजूनही कॉग्रेसने मुख्यमंत्री कोण याची अधिकृत घोषणा न केल्याने आता संपूर्ण महाराष्ट्राला हसावे का रडावे असा प्रश्न पडला आहे. यातच गळ्यात कधी माळ पडणार याची वाट पाहण्यात अशोक चव्हाण मुंबईत ताटकळत बसले आहेत.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मेणबत्त्या ते मिठाई चार दिवसांचा फरक
अशोक चव्हाण महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
माजी मंत्री टी जी देशमुख यांचे निधन
अखेर विलासरावांची 'देशमुखी' संपली
नव्या नेतृत्वाची आज घोषणा
भुजबळ बनणार उपमुख्यमंत्री?