मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > छगन भुजबळ गृह आणि उपमुख्यमंत्री
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
छगन भुजबळ गृह आणि उपमुख्यमंत्री
वेबदुनिया
कॉग्रेमुख्यमंत्रठरेपर्यंआपउपमुख्यमंत्र्यांचघोषणा न करण्याचनिर्णघेतलेल्यराष्ट्रवादीनअखेआपलमौसोडमहाराष्ट्राचबांधकामंत्रछगभुजबयांचउपमुख्यमंत्रआणि गृहमंत्रीपदनिवकरण्याआल्याचघोषणकेली.
मुंबईवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून आर. आर. पाटील यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदी कोणाची निवड होईल याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. पण पक्षाध्यक्ष शरद पवारांनी पुन्हा एकदा भुजबळांवर विश्वास दाखवून त्यांची या पदी नियुक्ती जाहीर केली आहे.

श्री. पाटील उपमुख्यमंत्री पदी येण्यापूर्वी भुजबळ हेच उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. मात्र, त्या काळातच तेलगी प्रकरण पुढे आले आणि संशयाची सुई त्यांच्याकडे वळाली. पक्षातून आणि विरोधकांकडूनही त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. एका वाहिनीवर या विषयावर उपरोधात्मक कार्यक्रम सादर झाला. त्यावेळी भुजबळ समर्थकांनी चिडून जाऊन त्या वाहिनीवर हल्ला चढविला आणि या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भुजबळांनी राजीनामा दिला. त्यानंतर मग राष्ट्रवादीत भुजबळांची उपेक्षाच झाली. पक्षाची सत्ता पुन्हा एकदा आल्यानंतर भुजबळांना सार्वजनिक बांधकाम हे खाते देण्यात आले. मात्र, तेही काटून छाटून. त्यामुळे त्यांना साईडलाईनला टाकले हे जाणवत होते. मात्र, आर. आर. पाटलांवर ही वेळ आल्याने भुजबळांचे ग्रह पुन्हा चमकले आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन गेले.
या पदासाठी जयंत पाटील, अजित पवार यांचेही नाव घेतले जात होते. पण भुजबळांचा एकूण अनुभव त्यांच्या कामी आला आणि हे पद पुन्हा त्यांच्याकडे आले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
चव्हाणांच्या मार्गात राणे आडवे
मेणबत्त्या ते मिठाई चार दिवसांचा फरक
अशोक चव्हाण महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
माजी मंत्री टी जी देशमुख यांचे निधन
अखेर विलासरावांची 'देशमुखी' संपली
नव्या नेतृत्वाची आज घोषणा