युवकांनी चिंतन, मनन व आत्मविश्वास ठेवून शक्ति व युक्तितून आपले भविष्य उज्ज्वल करावे. तेजस्वी शक्तिबळाने देशाची मान उंचावेल असे कर्तुत्व दाखवावे, असे आवाहन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोमवारी सोलापूर येथे केले.
केंद्र शासनाच्या नेहरु युवा केंद्राच्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या नेहरु युवा प्रशिक्षण केंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन व राज्यस्तरीय युवा संमेलनाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.जगदीश पाटील, नेहरु युवा केंद्राचे राज्याचे संचालक दिनेश रॉय उपस्थित होते. |