मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > भय्ये मराठीजनांना वाटणार तीळगूळ
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भय्ये मराठीजनांना वाटणार तीळगूळ
वेबदुनिया
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्यांविरूद्धचा आक्रमक पवित्रा कायम असताना उभय पक्षांतील संघर्ष मिटविण्यासाठी पुढाकार भय्यांनी घेतला आहे. येत्या मकरसंक्रांतीला उत्तर भारतीय सभेतर्फे मुंबईत ठिकठिकाणी मराठी भागात तीळगुळाचे वाटप करून कडू झालेले हे संबंध गोड करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

उत्तर भारतीय सभेचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबईभर होर्डिंग्ज व बॅनर उभारण्यात येणार आहेत. त्यावर तीळगूळ घ्या गोड गोड बोला असे मराठीत लिहिण्यात येणार आहे. त्याद्वारे मराठी लोकांना आपल्याशी गोड बोलण्याचे आवाहन केले जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी तीळगूळ वाटप केले जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत मराठी व उत्तर भारतीयांमधील संबंध बिघडले आहेत. ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलल्याचे निरूपम यांचे म्हणणे आहे. झाले गेले विसरून जाऊन संबंध गोड व्हावेत म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई कुणाची?
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाले यांचे निधन
'हिंदकेसरी' मल्लांना निवृत्तीवेतन - मुख्यमंत्री
नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांना लष्करची धमकी
सोनिया गांधींची राणेंनी माफी मागावी- देशमुख
मुंबईत आग विझवताना 19 जखमी
ठाकरेंनी दिले राणेंच्या परतीचे संकेत