काँग्रेसमधून निलंबित झालेल्या माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी आज दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी ए.के. एंटनी यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी त्यांनी मी अजुनही कॉंग्रेसमध्येच असल्याचे म्हटले आहे. ते आज सोनियांनाही भेटणार होते. मात्र सोनियांनी त्यांना सोमवारनंतरच भेटू शकणार असल्याचे कळविल्याने ही भेट सोमवारनंतरच होण्याची शकरूता आहे.
मुख्यमंत्री निवडीनंतर नारायण राणेंनी काँग्रेसमधील काही नेत्यांवर टीका केल्यामुळे त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होतं. त्यानंतर काही दिवसांनी नारायण राणे आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी दिलजमाई झाल्यानंतर आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच ते सोनियांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे ते आज एंटनी यांना भेटले. |