मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > प्रादेशिक > आ.सुरेश जैन भाजपमध्‍ये!
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आ.सुरेश जैन भाजपमध्‍ये!
वेबदुनिया
राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांशी वितुष्‍ट झालेले जळगावचे आमदार सुरेश जैन यांनी आता भाजपचा रस्‍ता धरला असून ते येत्‍या 23 रोजी गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्‍याचे जाहीर केले आहे. आ.जैन यांच्‍या भाजपा प्रवेशासाठी येथील शिवसेनेचे स्‍थानिक नेतेही प्रयत्‍नशील असल्‍याचे समजते.

पक्ष बदलासाठी प्रसिध्‍द असलेल्या आ.जैन यांनी गेल्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून दिले होते. त्‍यानंतर त्‍यांना राष्‍ट्रवादीने मंत्रिपदही दिले होते. मात्र भ्रष्‍टाचार विरोधी जनआंदोलनाचे नेते आण्‍णा हजारे यांनी त्‍यांच्‍यावर केलेल्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपांवरून त्‍यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्‍यापासून पक्षाच्‍या नेत्यांशी त्‍यांचे संबंध दुरावले होते. या काळात त्‍यांनी जिल्ह्यात पक्षाला संपविण्‍याची भूमिका घेऊन जिल्‍ह्यातील स्‍थानिक निवडणुकांमध्‍ये सरळ पक्षाच्‍या विरोधात उमेदवार उभे केले होते. अखेर आता त्‍यांनी पक्ष सोडण्‍याचा निर्णय घेतला आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
राणेंनी घेतली एंटनींची भेट
मुंबईत प्रतिकोल्हापूर महोत्सव
भय्ये मराठीजनांना वाटणार तीळगूळ
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाले यांचे निधन
'हिंदकेसरी' मल्लांना निवृत्तीवेतन - मुख्यमंत्री
नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांना लष्करची धमकी