रानाचं वेल्हाळ पाखरू.. पद्मश्री कवीवर्य ना. धों. महानोर यांना यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी नाशिकमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे मराठी साहित्यात उल्लेखनीय योगदान देणा-या साहित्यिकाला दर दोन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कार समितीचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महानोरांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुसूमाग्रजांच्या हयातीत सुरू झालेला हा पुरस्कार मला मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा भावना महानोरांनी वेबदुनियाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या. |