गेल्या दोन महिन्यांपासून शांत झालेले उत्तर भारतीयांविरुध्दचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन पुन्हा तोंड उघडण्याची चिन्हे दिसत असून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी पक्षातर्फे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये उत्तर भारतीयांना 'तीळगूळ घ्या, तिकीट काढा आणि घरी परत जा', असा शुभेच्छा (!) संदेश देण्यात आला आहे. मनसेने आता गांधीगिरीचा मार्ग पत्करला असून वैरभाव विसरून सर्वांना गोड होण्याचा संदेश देणा-या संक्रांतीच्या दिवशी उत्तर भारतीयांना तीळगूळ घ्या... गोड-गोड बोला, तिकिट काढा आणि आपल्या घरी परत जा असा संदेश दिला आहे. मनसेच्या या पोस्टर्सचा परिणाम उत्तर भारतीयांवर होण्यापूर्वी हिंदी प्रसार माध्यमांवरच अधिक झाला असून त्यांनी राज ठाकरे यांच्यासह मनसेवर पुन्हा जोरदार आगपाखड सुरू केली आहे. |