कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील मंत्रिपदाबाबतचा तिढा न सुटल्यास आणि एकमत न झाल्यास आपला पक्ष कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देऊ शकतो, असे सुतोवाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी आघाडीकडे आजचा शेवटचा दिवस शिल्लक असून त्या दृष्टीने हालचाली जलद झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण व छगन भुजबळ यांनी या संदर्भात राज्यपालांची भेट घेतली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी दोन्ही पक्षात एकमत न झाल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ शकतो असा पवित्रा घेतला आहे.