आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » महाराष्ट्र माझा » मनसेचे आमदार बसणार कुठे?
Feedback Print Bookmark and Share
 
नागपूर- नागपुरात डिसेंबरमध्ये होणार्‍या हिवाळी अधिवेशनात आकर्षणाचा केंद्रबिंदु जर यावेळी कुणी राहणार असेल तर तो आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार! हा पक्ष प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि एक, दोन नव्हे तर या पक्षाचे चक्क १३ आमदार निवडून आले. विधानसभेत सर्वच पक्षांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. पण, मनसे नावाचा पक्ष विधानसभेत येऊ शकतो, हा विचार आतापर्यंत कुणीच केला नव्हता त्यामुळे या पक्षाच्या १३ आमदारांच्या बसण्याची व्यवस्था कुठे करायची, हा प्रश्न विधिमंडळ सचिवालयाला पडलेला आहे.

विधानभवनात या पक्षासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करावीच लागणार आहे. विधिमंडळ सचिवालयाची ती जबाबदारीच आहे. पण, सभागृहात एमदम १३ आमदारांच्या बसण्याची व्यवस्था आणि ती देखील उपलब्ध जागेत करणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरणार आहे. या पक्षाला स्वतंत्र कक्ष देण्याच्या मुावर सध्या केवळ चर्चेचे गुर्‍हाळच सुरू आहे.

अंतिम निर्णय आप झालेला नाही. तथापि, तो लवकरच घेण्यात येईल आणि मनसे आमदारांच्या बसण्याची योग्य व्यवस्था केली जाईल, असे विधानभवनातील एका अधिकार्‍याने हिंदुस्थान समाचारच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. राज ठाकरे यांचे १३ आमदार प्रथमच सभागृहात येणार असल्याने ते कशी कामगिरी करणार याकडेही सभागृहाचे विशेष लक्ष राहणार आहे.
संबंधित माहिती शोधा