मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » महाराष्ट्र माझा » दोन्ही कॉंग्रेसना २०-२० मंत्रिपदे; उद्या शपथविधी (Maharashtra stalemate ends, Cong-NCP govt to be sworn-in tomorrow)
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील खातेवाटप अखेर उभय पक्षांच्या समाधानाप्रमाणे झाले असून आता उद्या (शुक्रवारी) सरकार स्थापनेचा मुहूर्त साधला जाईल. समझोत्याप्रमाणे दोन्ही पक्षांना प्रत्येकी वीस कॅबिनेट मंत्रिपदे मिळतील.
हे दोन्ही पक्ष आज संध्याकाळपर्यंत राज्यपालाकंडे सत्तास्थापनेसाठी दावा करतील आणि उद्या शपथविधी समारंभ होईल. खातेवाटप झाले तरी कोणते खाते कुणाकडे जाईल हे मात्र स्पष्ट झालेले नाही. विशेषतः वादाचे विषय ठरलेली गृह आणि वित्त ही दोन खाती कोणाकडे जातील याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही.
खातेवाटपाच्या घोळातून मार्ग काढण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील बुधवारी संध्याकाळी दिल्लीत रवाना झाले होते. तिथे त्यांची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी सखोल चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल हेही यावेळी उपस्थित होते. या चर्चेनंतरच श्री. पटेल कॉंग्रेसच्या मंडळींकडे गेले आणि तिथ त्यांनी राष्ट्रवादीची बाजू मांडली. त्यानंतर पुन्हा पवारांच्या निवासस्थानी येऊन काय घडले ते सांगितले.
या सगळ्या घडामोडीतून खातेवाटपात एकमत झाल्याचे समजते.