महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यात खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
ज्येष्ठ नेते ए. के.एंटोनी व अहमद पटेल यावेळी उपस्थित होते. कोणती खाती कोणाकडे द्यावीत याविषयी चर्चा झाली. कॉंग्रेसमध्ये यंदा पदांसाठीही मोठी स्पर्धा आहे. नारायण राणे, पतंगराव कदम या बड्या मंत्र्यांना कोणती खाती द्यावीत हा प्रश्न आहे.