आज सायंकाळी शपथविधी

गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मंत्रिपदांच्या वाटणीवरून सुरू असलेला घोळ मिटण्याची चिन्हे दिसत असून राज्यपालांच्या अल्टीमेटमनंतर विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला असून नवीन मुख्यामंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता राजभवनात होणार आहे. या समारंभात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे 20 तर काँग्रेसचे 17 मंत्री शपथ घेणार आहेत. अशोक चव्हाण व छगन भूजबळ यांनी राज्यपालांकडे दाखल केलेल्या दाव्यात आपल्याला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.