आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » महाराष्ट्र माझा » हल्‍ला करणारे शिवसेनेचे वाघः सामना
Feedback Print Bookmark and Share
 
सचिन तेंडुलकरच्‍या मुंबई सर्वांची या वक्तव्‍यावर टीका करून त्याला 'खेळपट्टी सांभाळ राजकारण करण्‍याचा प्रयत्न करू नको' असा सल्‍ला दिल्‍ल्‍याबददल आयबीएन-लोकमत या वाहिनीच्‍या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात बाळासाहेबांविरोधात गरळ ओकणा-या निखिल वागळे आणि सहका-यांना शिवसेनेच्‍या वाघांनी चांगली अद्दल घडवली अशा शब्‍दात शिवसेनेने सामनातून हल्‍ल्‍याचे समर्थन केले आहे.

शिवसेनेविरोधात वारंवार टीका केल्‍याबद्दल 'आयबीएन-लोकमत'च्‍या कार्यालयावर शिवसेनेच्‍या सुमारे 40 ते 50 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी हल्‍ला केला या हल्‍ल्‍याचे शिवसेनेने खुलेपणाने समर्थन केले असून हल्‍लेखोरांची नावेही वृत्तपत्रातून प्रसिध्‍द केली आहेत.

हल्‍लेखोरांनी निधड्या छातीने वाघासारखा हा हल्‍ला केल्याचे सां‍गतानाच हा हल्‍ला म्हणजे एखादा मोठा पराक्रम असल्‍यासारखे त्याचे वर्णन करण्‍यात आले आहे. तर हल्‍ला करणा-यांनी 'आयबीएन-लोकमत'ला ठोकले, तोडले व फोडले अशा शब्‍दात हा हल्‍ला म्हणजे मोठी मर्दुमकी असल्‍यासारखा आव आणण्‍यात आला आहे.

शिवसेनाप्रमुखांबद्दल प्रेम असणा-यांच्‍या भावनांचा स्‍फोट असल्‍याचे सांगून वाहिनीचे संपादक निखिल वागळे यांना 'वट-वटवागळे' म्हणून संबोधले आहे.


यावेळी सामनाने जाहीर केलेल्‍या प्रमुख हल्‍लेखोरांची नावे अशीः विशाल मौर्या, शैलेश सकपाळ, अश्‍वीन सावेकर, प्रवीण राजपूत, किशोर वीटकर, सुनील मोरे, स्‍वप्निल किणी.
संबंधित माहिती शोधा