आयबीएन लोकमत या वृतवाहिनीवर शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्यामागे शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. श्री. राऊत फरारी असून त्यांना पकडण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत.
सुनील यांनी नुकत्याच झालेल्या भांडूप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातले १७ जण मुंबईतील तर सहा जणांना पुण्यातील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आयबीएनच्या कर्मचार्यांनीच यातल्या सात जणांना पकडून ठेवले होते.
अटक करण्यात आलेल्यांना शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.