महाराष्ट्रातील रेल्वे भरतीत मराठी उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी करत राज ठाकरेंच्या सुरत सुर मिळविला आहे.
मुंबई ते नागपूर दुरांतो या विनाथांबा रेल्वेगाडीला आज हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यावेळी चव्हाणांनी ही मागणी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींकडे केली. त्याचवेळी या गाडीला सचिन तेंडुलकर एक्सप्रेस असे नाव द्यावे असेही सुचविले.