उत्तर भारतीयांवर रेल्वे भरती परीक्षा दरम्यान झालेल्या हल्ल्यांप्रकरणी मनसे नेते राज ठाकरे यांना तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
WD
WD
2008 मधील ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने राज यांना या प्रकरणी नोटीस बजावल्यानंतर राज आज भडगाव कोर्टात हजर झाले. त्यांना वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी दहा हजाराचा जामीन मंजूर करण्यात आला.
दुसरीकडे मुंबई हल्ला झाला तेव्हा विलासराव एका कंपनीला पुलाचे काम देण्यात गुंतल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला होता. या प्रकरणी गडकरी यांना भोईवाडा कोर्टाने पाच हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.