पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे बुधवारी काही महानगरपालिकांमधील महापौरपदाजी आरक्षण सोडत नव्याने काढण्यात आली. या सोडतीमुळे काही जणांचा पत्ता कट झाला, तर काहींच्या आशा पल्लवीत झाल्या. काही ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहिल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडला.