आपण दिवसभरात अनेक जणांना भेटतो.... दिवसभरात हजारो अनोळखी चेहरे आपल्यासमोर येतात आणि जातात. त्यापैकी काही चेहरे सुंदर असतात... तर काही कुरूप, काही गोल तर काही लांबट... हे चेहरे पाहिल्यानंतर ती व्यक्ती कशी आहे? तिचे वागणे कसे आहे? तिचा स्वभाव कसा आहे, हे सांगता येईल का?
अवघड आहे नाही का? पण याबाबतही काही शास्त्रे आहेत. त्यांचे काही ठोकताळेही आहेत. त्या आधारे स्वभावाचा अंदाज चेहर्यावरून बांधला जातो. उदाहरणच द्यायचे झाले तर ही चित्रे पहा... फ्रान्सचे कलाकार चार्ल्स ले बर्न यांची ही चित्रे. चार्ल्सचा जन्म 17 शतकात झाला. 1619 ते 1690 या काळात तो 14 व्या लुईसच्या रॉयल कोर्टातील पहिला चित्रकार होता. ही चित्रे तमिळनाडूतील तंजावरच्या सारावाथी महल वाचनालयात आहेत. चार्ल्सने काही चेहर्यांमध्ये जनावरांच्या चेहर्यांच्या आकृत्याही काढल्या आहेत.
चार्ल्सने मानवी चेहरे आणि त्यामागील हावभावांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्यानुसार प्रत्येकाचा चेहरा कुठल्या ना कुठल्या पशू किंवा पक्ष्यासोबत जुळतो. त्या प्राण्याचे किंवा पक्ष्याचे काही व्यावहारिक गुणही त्याच्यात दिसून येतात. चार्ल्सच्या या संशोधनास फीजियोग्नामीत समावेश करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीच्या चेहर्यावरून त्याचा स्वभाव सांगणारे फीजियोग्नामी हे एक शास्त्र आहे.
समजा कुणाचा चेहरा कुत्र्याशी मिळता-जुळता आहे. तर त्याचा स्वभाव कुत्र्यासारखा असेल आणि तो रागावेल तेव्हा तो कुत्र्यासारखा दिसेल? किंवा तो कुत्र्यासारखा आपल्या मालकाबद्दल प्रामाणिक असेल? हे सहजी पटणारे नाही. पण या संदर्भातले शास्त्र मात्र हेच सांगते.
आपल्याही देशात चेहर्यावरून स्वभाव सांगण्याची एक पध्दत अस्तित्वात आहे. त्याला समुथीरिका लक्षणम् म्हटले जाते. फार कमी जणांना माहीत असलेल्या या पध्दतीचा वापर कित्येक वर्षांपासून केला जातोय. ज्योतिषी याच पध्दतीने लोकांचे चेहरे पाहून त्यांचे भविष्य वर्तवित असतात.
यासंदर्भात ज्योतिषी के.पी. विद्याधरन यांना चार्ल्सची चित्रे दाखविली. नंतर त्यांना फीजियोग्नामी आणि समुथीरिका लक्षणम् या कलांबद्दल सांगितेले, असता त्यांनी याला पुष्टी दिली. ते म्हणाले, की बर्याचदा एखाद्याचे डोळे मांजरीसारखे असतात. अशा लोकांच्या कामाची पध्दतही मांजरीसारखी सावध असते. ‘काहींचे डोळे घोड्यासारखे असतात. अशा व्यकती घोड्यासारखी न थकता कामे करतात. काहींचे डोळे पक्ष्यासारखे असतात. त्यांची वागण्याची पध्दतही तशीच असते.
मात्र, अशा अंदाजावरून मिळालेली माहिती खरी ठरू शकते का? हे वादाचा विषय आहे. कुणाचा स्वभाव केवळ त्याच्या चेह-यावरून सांगणे हे अगदी अवघड आहे. पण याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की लिहा.
|