रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव!


rakhi
WD
स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो ाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते.

व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा ीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.

लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो.

बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते. बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपरी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते.

दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

सण-उत्सव

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, ...

श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा

श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही ...

महंते महंत करावे!

आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा लाभ होऊन बरीच वर्षे झालीत. सर्वत्र मोठ्या थाटामाटाने ...

समर्थ रामदास स्वामी

ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत जनाबाई, मुक्ताबाई, सोपानदेव यासारख्या अनेक संतांचे ...

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

सण-उत्सव

रामभक्त हनुमानाचे अनोखे संग्रहालय

-अरविंद शुक्ला,

नाशिकचे काळाराम मंदिर

दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या ...

नवीनतम

गुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा

जगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार! प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या प्रेषिताला ...

पंचकामध्ये कुठले शुभ कार्य वर्जित आहे

पंचकाला ज्योतिष शास्त्रात शुभ नक्षत्र मानले जात नाही. याला अशुभ आणि हानिकारक नक्षत्रांचा योग म्हणून ...

Widgets Magazine