मुख्य पृष्ठ > धर्म > हिंदू > हिंदू धर्माविषयी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गजानन महाराजांची आरती

gajanan maharaj
MH GOVT
जय जय सच्चित्वस्वरूप स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय ‍अविनाशी।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी।।
तें तूं खरोखर नि:संशय अससी।
लीलामात्रें धरिलें मानव देहासी।।1।।
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा।
करुनी गणि गण गणात बोते या भजना।।
धाता हरिवर गुरुवर तूंचि सुखसदना।
जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना।।2।।
लीला अनंत केल्या बकटसदनास।
पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस।।
क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश।।3।।
व्याधि वारुन केले कैंकां संपन्न।
करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन।।
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन।।4।।
आणखी
मंत्रांमध्ये असणारी शक्ती
आशीर्वाद
ज्याचे जीवन साधे असते तोच खरा साधू
ज्ञान व प्रभूप्रेम
भक्ती
देवासाठी घरं बांधणारी माणसं