भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुति वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥ महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें । सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ॥ दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा । पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥ लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना । पुण्यवंता,पुण्यशीला, पावना परितोशका ॥ ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोट्ला पुढे । काळाग्नी , काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥ ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती । नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भुरकुटी,ताठिल्या- बळें ॥ पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंड्लें बरीं । सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥ ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू । चपळांग पाहतां मोठे, महाविध्युल्लतेपरी ॥ कोटिच्या कोटि उड्डाणें, ज़्हेपावें उत्तरेकडे ॥ मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥ आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं । मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥ अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें, मेरुमांदार धाकुटे ॥ ब्र्म्हांडाभोंवतें वेढे, वज्रपुछए करुं शके । तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥ आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंड्ळा। वाढ्ता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥ धनधान्य्पशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही । पावती परुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुऐयां ॥ भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि । नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें । हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ॥ दृढदेहो निसंदेहो सैख्या च्न्द्रकळागुणें ॥ रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू । रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥ ।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥
|