रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. रुद्राक्षाचा अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात.
आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्णवीर्य व आयूकफनाषक आहे.त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष मालेत) असते. रुद्राक्ष मालेने मंत्रसाधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.
रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्रीपुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला एकशेआठ रुद्राक्षांची असते. सत्तावीस मण्यांचीही माला गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करणार्यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नकोच. वळ्याएवढा, वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो, अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथात असे सांगितले आहे की, दोन तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला
| | रुद्राक्ष शेंडीत एक, डोक्यात चाळीस, गळ्यात बत्तीस, प्रत्येक वाहूत सोळा, कानात एक एक, हातात बारा आणि एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात घालावी. असे शिवपुराणात सांगितले आहे. |
| |
असता तो स्वत:भोवती हळूहळू फिरतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खाल पर्यंत गेलेली तरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते तीही अशाच अनेक प्रवाहाने समुद्राला मिळते, त्याला नदीची मुखे म्हणतात. तशीच ही रुद्राशंची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात. काही ग्रंथकारांच्या मते 1,3,5,9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात.
रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय. दोन रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात, त्याला शिवपार्वती समजले जाते.
|