आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज् द्यावे । पसायदान् हे ।।
जेखळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूतो परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।
दुरितांचे तिमिर् जावो । विश्र्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो लाहो । प्राणिजात् ।।
वर्षत् सकळ भूमंगळी । ईश्र्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत् भूमंडळी । भेटतु भुता ।।
चला कल्पतरूंचे अरव् । चेतना चिंतामणीचे गाव् । बोलते जे अर्णव् । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन् । मार्तंड् जे तापहीन् । ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी । ते सर्वाही सदा सज्जन् । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी । भजीजो आदिपुरूखी । अखंडित् ।।
येथे म्हणे श्रीविश्र्वेश्र्वरावो । हा होईल् दान पसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।। - संत ज्ञानेश्र्वर
|