संतसनकादिक भक्त मिळाले अनेक। स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ।।1।।
नवल होताहे आरती देवाधिदेवा। स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ।।धृ।।
नर नारी तटस्थ टक पडिलें नयना। ओवाळीतां श्रीमुख धणी न पुरे मना ।।नवला।।2।।
एका जनार्दनीं मंगल आरत्या गाती। मंगल कौतुकें गाती। मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती ।।नवल।।3।।
|